८ मार्च आंतराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त महिलांना पूर्ण वेतनी सुट्टी जाहीर करा: सविता पुराम

गोंदिया १९: जगभरात महिलांना स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस आंतराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, शिक्षण किंवा मतदान या सारख्या अधिकारांपासून स्त्रिया बंचित होत्या मुळात नोकरीसाठी स्वेच्छेने किंवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी पुरुषा इतके काम करुनही समान वेतन मिळत नव्हते समान संधी सुध्दा उपलब्ध नव्हत्या परंतु आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्या स्त्रियांनी केले त्या स्त्रियांच्या योगदाना बद्दल सैदव कृतज्ञ असणे आवश्यक आहे. त्याच मुळे आज समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे ती साजरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

त्यामुळे हा दिवस जगभरातील सर्व स्त्रियांनकरिता महत्वाचा असून अस्तिवाची जानिव करुन देणारा दिवस आहे आणि तो साजरा करण्याकरिता सेवेत असणाऱ्या स्त्रियांना ८ मार्च या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना निवेदनातून केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share