95 लाखांच्या धान व बारदान्याचा अपहार

देवरी 21: तालुक्यातील आलेवाडा येथील आधारभूत धान केंद्रात 95 लाख 19 हजार 373 रुपयांच्या धान व बारदान्याचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली. देवरी उपप्रादेशिक कार्यालयाचे कनिष्ठ लिपीक तथा प्रभारी विपणन निरीक्षक भुषण भांडारकर यांनी कालेवाडा येथील धान खरेदी केंद्राच्या खरीप हंगाम 2020-21 मधील धान खरेदीची तपासणी केली असता ही बाब समोर आली.

संस्थेच्या संचालकांनी 1 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान संगणमत करुन धान व बारदान्याचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी संचालक मंडळाविरोधात चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share