प्रा.डॉ. गंगणे यांना डॉ. भा.ल भोळे संदर्भग्रंथ पुरस्कार
देवरी: डॉ. भा. ल. भोळे विचार मंच नागपूर (award) व कमला नेहरू महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. भा.लं.भोळे संदर्भ ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा कमला नेहरू महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी देवरी येथील भोई गौरव मासिकाच्या सहसंपादिका व प्रख्यात लेखिका डॉ. वर्षा गंगणे यांना या वर्षीचा डॉ. भा. ल. भोळे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा.शेषकुमार येरलेकर यांच्या अध्यक्षतेखाली (award) पार पडलेल्या या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून मा. प्राचार्य केशव भांडारकर, प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे आ. अॅड. अभिजीत वंजारी, प्रा. डॉ. अशोक काळे, कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक उपस्थित होते. सत्कारमूर्ती प्रा.डॉ. वर्षा गंगणे यांना पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी त्यांच्या ‘स्त्री विकासाच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. समारंभाला भोई गौरव मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे व सह-संपादक डॉ.बळवंत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रसंगी साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. डॉ. वर्षा गंगणे या गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित देवरी येथील मनोहर भाई पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचे आत्तापर्यंत एकूण पंधरा पुस्तक प्रकाशित झालेली आहे. तसेच सहा ते सात पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आतापर्यंत त्यांना साहित्य, सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या भोई गौरव मासिकाच्या नियमित स्तंभ लेखिका आहेत. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल भोई गौरव मासिक परिवाराच्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांचे अशीच उत्तरोत्तर प्रगती हो असे शुभेच्छा दिल्या.