पश्चिम बंगालचे हत्ती नियंत्रक नागनडोह येथे

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील केशोरी, नागणगाव येथे बुधवार रोजी 12 ऑक्टोबर रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने घातलेल्या धुमाकुळामुळे स्थानिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पश्चिम बंगाल येथून आलेले 6 जणांचे हत्ती नियंत्रक पथक व वन विभागाचे रेस्क्यू पथक परिसरात 13 ऑक्टोबरपासूनच स्थळ ठोकून आहेत. नागणगाव येथील वस्तीत हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात गोठयांचे नुकसान केले. त्यामुळे स्थानिक गावकर्‍यांनी इतरत्र हलविण्यात आले असून जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक एच. आर. मेश्राम यांच्या मदतीने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान वन विभागाने या गावकर्‍यांना चार-पाच दिवस गावातच राहण्याचे निर्देश दिले आहे. तसेच हत्तीचा मुक्काम याच परिसरात असल्याने हत्ती नियंत्रक पथक रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे कर्मचारी तळ ठोकून असून हत्तींच्या कळपांना इतरत्र हलविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

Share