रायपूरसह अन्य जिल्ह्यात अधिकारी व व्यापा-यांवर ईडीचे छापे, चार कोटी जप्त

प्रहार टाईम्स : छत्तीसगढची राजधानी रायपूर, रायगढसह अन्य जिल्ह्यात काल (मंगळवार, दि.११) पहाटे ईडीने अंमलबजावणी राज्यातील काही अधिकारी व व्यापा-यांवर छापा टाकला. मंगळवारी (दि.११) सायंकाळपर्यंत जवळपास चार कोटींच्या रोख रकमेसह कोट्यावधी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

छत्तीसगढ राज्यातील काही शहरात मंगळवारी (दि.११) पहाटे ईडीने अधिकारी, व्यापा-यांवर छापा टाकला. ईडीची मंगळवारी सायंकाळपर्यंत ही छापेमारी सुरु होती. ज्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांवर छापा पडला आहे त्यापैकी काहीजणांवर यापूर्वीही छापा पडला आहे. दुर्ग, रायपूर , महासमुंद जिल्ह्यासह अनेक ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळपर्यंत चार कोटींची रक्कम सापडली आहे तर कोट्यावधी रुपयांचे दाग-दागिने सापडले आहेत.

या अधिकाऱ्यांवर छापेमारी

छत्तीसगढमधील ज्येष्ठ अधिकारी सौम्या चौरसिया, रायगढ जिल्ह्याचे कलेक्टर रानू साहू यांच्या घरावर, महासमुंद जिल्ह्यातील अग्नि चंद्राकर, सूर्यकांत तिवारी, आयएस जेपी मौर्य यांच्या घरावर, रायगढ मधील गांजा चौकातील नवनीत तिवारी, प्रिंस भाटिया, सीए सुनील अग्रवाल यांच्यावर ईडीने छापे मारले आहेत. ईडीची ही छापेमारी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु होती. सौम्या चौरसिया, कलेक्टर रानू साहू, सुर्यकांत तिवारी यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. दरम्यान त्यावेळी अंदाजे २०० कोटी रुपयांची जंगम स्थावर मालमत्ता सापडली होती.

Share