रानटी ड्डक्कराची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना अटक; एक फरार
देवरी : उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात (दि. १०) ला मुल्ला सहवनक्षेत्रातील वडेगांव बिटातील संरक्षीत वन कक्ष क्र. ५७६ मध्ये रानडुकराची शिकार झाल्याचे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा पिडकेपार/गोटाबोडी येथील गोपाल मोतीराम नाईक, शिवलाल नत्थु चौधरी, अरुण रामचंद्र चौधरी, कैलास सुखराम नाईक, मानिकचंद यादोराव राऊत व राजेश उर्फ भागवत दशरथ राऊत सर्व राहणार पिडकेपार यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून शिजवलेले रानडुकराचे मास-भांड्यासहित जपत करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणी संतोष प्रल्हाद राऊत राहणार गोटाबोडी हा फरार झाला असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. वरील सर्व सातही आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९७२ चे कलम २, ९, ३९, ४८, ५०, ५१ अन्वये वन गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास कुलराज सिंह उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया, प्रदीप पाटील सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धात्रक वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी व जी. टी. ठवरे, वनपाल मुल्ला, एस. एम. उके, वनसंरक्षक वडेगांव हे करित आहेत. सदर कार्यवाहीत उत्तर देवरी वनपरिक्षेत्रातील एम. एस. कुंभरे वनपाल, पी. टी कामडी वनपाल, एम. व्ही. कोरे वनपाल, ए. टी. बिसेन, ए. एम. अंबादे, पी. पी. रुपनर, के. बी. कापसे वनरक्षक सहभागी होते.