शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करा: प्रकाश परिहार अध्यक्ष शिक्षक आघाडी

देवरी ११: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी १ आक्टोबरपासून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला फॉर्म १९ भरून लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन भाजप शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रकाश परिहार यांनी केले आहे.

१ ऑक्टोबर २०२२ पासून मतदार नोंदणी अधिनियम १९७० च्या कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नाव नोंदविण्यासाठी पात्र व्यक्तीने दावा अर्ज नमुना – १९ मध्ये रंगीत छायाचित्र रहिवासी पुरावा, अध्यक्षांचे प्रमाणपत्रासह अर्ज भरणे आवश्यक आहे.

संस्था प्रमुखांचे प्रमाणपत्र नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय उपलब्ध नसल्याने प्रत्येक पात्र शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने नमुना – १९ मध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रिये मधे ऑक्टोबर २०२२ पासून तर ९ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन टप्प्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमुना १९ भरणे अनिवार्य आहे.

Print Friendly, PDF & Email
Share