देवरी येथे पूर्व पोलिस भरती प्रशिक्षण शिबिराची सांगता, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांची प्रमुख उपस्थिती

देवरी ११: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच गोंदिया पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूर्व पोलिस भरती प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाच्या सभागृहात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर , देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, देवरीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद गजभिये आणि देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी केली यावेळी पोलिस विभागाने शिबिरार्थीची निवड करताना दूरक्षेत्रातील अगदी नवख्या उमेदवारांची निवड केली. या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्यंत नव्या दमाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. प्रशिक्षणाचे शेड्यूल अगदी काटेकार आणि वेळेचे अपव्यय टाळणारे असल्याचे प्रस्ताविकेत सांगितले.

एक महिना चाललेल्या या शिबिरात अत्यंत दुर्गम भागातून 65 मुलामुलींची निवड करण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी उमेेदवारांनी सुद्धा आपले दिलखुसाल मनोगत व्यक्त करताना पोलिस विभाग आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आभार मानले. उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी आपण पोलिस प्रशिक्षण केंद्रात नक्की दिसणार, असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.

परिस्थितीला दोष न देता अपार कष्ट करा आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायची जिद्द बाळगा, श्रमाला दुसरा पर्याय असूच शकत नाही, असे असे विचार देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोदिया मुख्यालयातील महिला हवालदार मंगला प्रधान यांनी केले. उपस्थितांचे आभार देवरीच्या पोलिस उपमुख्यालयातील नक्षलसेलचे पोलिस उपनिरीक्षर बाहकर यांनी मानले.

Share