आदिवासी समाजातील मुलांनी आरक्षणाचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे: आ. कोरोटे

■ बोरगावं/बाजार येथील एकलव्य पब्लिक शाळेत आयुर्वेदीक झाडांचे व्रुक्षारोपण

देवरी,ता.११: भारतातील राज्य घटनेने दिलेल्या आरक्षणामुळे शासनाच्या ९ हजार कोटी च्या बजेट पैकी २ कोटी हा शिक्षणावर खर्च होतो.त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य माँडेल पब्लिक स्कुल येथे इंग्रेजी मिडीयमच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे प्रत्येक मुलांनी जिद्दीने अभ्यास करून आपल्या लक्ष पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आज मिळणा-या आरक्षणाचे आपल्या जीवनात सोने केले नाही तर उद्या काय व्यवस्था होईल हे सांगता येत नाही. आदिवासी समाज हा मुळात गरीब समाज असल्याने ते आपल्या मुलांना उच्चदर्जाचे शिक्षण देवू शकत नाही.पण शासनाच्या आदिवासी समाजातील बजेट मधून मुलांना एकलव्य स्कुल असो किंवा नामांकीत शाळा असो ह्या मधून शिक्षण घेणे सोईचे झालेले आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील मुलांनी आरक्षणाचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले
आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील बोरगावं/बाजार येथील एकलव्य माँडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुल परिसरात मंगळवारी रोजी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, नागपूर यांच्या वतीने पोषण महिना अंतर्गत मंगळवार रोजी आयुर्वेदीक झाडाचे व फळांचे झाडांचे व्रुक्षारोपण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार हे होते. या प्रसंगी आयुर्वेद संस्थान नागपूरचे अनुसंधान अधिकारी डॉ. वनमाला वाकोडे, बोरगाव/बाजारचे सरपंच कल्पनाताई देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल जाळे, उपाध्यक्ष नामदेव आचले, देवरीचे नगरसेवक मोहन डोंगरे, शासकिय कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजारचे प्राचार्य एन.एल.भाकरे, ग्रा.पं.सदस्य कैलाश देशमुख, पुनाराम तुलावी, एकलव्य पब्लिक सकुल चे प्राचार्य चारूलता सहारे, अधिक्षक डी.ए.लिंबोरे, अधिक्षिका एस.एस शेबे यांच्यासह दोन्ही आश्रमशाळे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राचार्य चारूलता सहारे यांनी तर संचालन विजयकुमार गोरे यांनी आणी उपस्थितांचे आभार विवेक पाटिल यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share