ढासगड येथे काली मातेच्या मूर्तीची थाटात प्राण प्रतिष्ठा

देवरी 11: तालुक्यातील ढासगड येथे आदिशक्ती माँ काली मातेच्या पूर्णाकृती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले.

याप्रसंगी सभापती सविता पुराम ढासगड संस्थेचे अध्यक्ष अमररत्न तवाडे बाबा महाराज, माजी आमदार संजय पुराम, पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, उपसभापती अनिल बिसेन, तालुका उपाध्यक्ष प्रमोद संगिडवार, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, नगराध्यक्ष संजू ऊके, नगरसेवक संजय दरवडे, विनोद भेंडारकर, झामसिंग येरणे, यादोराव पंचमवार, नितेश वालोदे, प्रभा सलामे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय पुराम यांनी केले. आभार सविता पुराम यांनी मानले. कार्यकमाला मोठ्या प्रमाणात गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share