आता पोलिसांना 12 ऐवजी 20 नैमित्तिक रजा

गोंदिया: राज्यातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांना एका वर्षात देत असलेल्या 12 दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी 20 दिवसांच्या रजा करण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा गृहविभागाने सोमवार 3 ऑक्टोबर रोजी आदेश निर्गमित केला. या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्यातील दीड हजार पेक्षा अधिक पोलिस कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

पोलिस दलातील कामकाजाचा व्याप, प्रतिदिन आठ तासापेक्षा जास्त कर्तव्य पोलिसांना पार पाडावे लागते. त्याचबरोबर विविध सण व उत्सवांच्या अनुषंगाने असलेला बंदोबस्त तसेच व्हीआयपी व अन्य बंदोबस्त या बाबी विचारात घेण्यात आल्या. याचा परिणाम अधिकारी व कर्मचार्‍यांच्या शारिरीक, मानसिक आरोग्य व कार्यक्षमतेवर होतो. आरोग्य व कौटुंबिक स्वास्थ या दृष्टिकोनातून पोलिस शिपाई ते निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजेत वाढ करण्याचा विचाराधीन होता. त्यानुसार मंत्रीमंडळाच्या मान्यतेने पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रजेचा निर्णय गृहविभागाने घेतला. अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे यांनी याबाबतचा आदेश 3 ऑक्टोबर रोजी काढला. दरम्यान, सध्या पोलिसांना 45 हक्काच्या रजा तर आजारी वैद्यकिय रजा मिळतात.

Print Friendly, PDF & Email
Share