“आदर्श शाळा सावली (पंढरपूर )येथे किशोरवयीन मुलींची गुड टच बॅड टच मार्गदर्शन शिबीर संपन्न “

प्रहार टाईम्स
देवरी 07: आदर्श शाळा सावली येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बिंझलेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विध्यार्थ्यांना गूड टच बॅड टच तसेच वाढत्या घडामोडी लक्षात घेऊन किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यकर्माचे अध्यक्ष सविताताई पुराम (सभापती महिला बाल कल्याण जी. प. गोंदिया ),प्रमुख मार्गदर्शक सुजाता ताराम (वैद्यकीय अधिकारी ), झुलनताई पंधरे (सरपंच ग्रा. प. सावली ), संजय बिंझलेकर (अध्यक्ष शा. व्य. समिती ), चंद्रसेनजी रहांगडाले (पो. पा.), शिवेंद्र परिहार, राजेश्वरीताई बिंझलेकर, नाजुकाताई गौतम, मनोहरजी भेलावे, अनिलजी भेलावे, अनिलजी खंडाळकर, मनोरंमा शेंडे .हेमलता चकोले, छन्नेश्वरी वैध्यें,उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक दीपक कापसे यांनी शालेय भौतिक सुविधा पूर्वीन्याविषवी सविता पुराम यांच्या कडे मागणी केली असता त्यांनी शाळेसाठी मल्टीयुनिट शौचालय देण्याचे मान्य केले. तशेच संजयजी बिंझलेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शालेय विध्यार्थ्यांना गोड जेवणाचे आयोजन करून सर्वासोबत जेवण केले आणि शाळेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे संचालन तुषार कोवले सर तर आभार सौं वालदे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक लांजेवार सर , श्री साखरे सर, श्री शेंडे सर आणि समस्त विध्यार्थी यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share