ब्लॉसम स्कुलमध्ये ‘कॅन्सर वर बोलू काही’ कार्यक्रम संपन्न

◼️ लायन्स क्लब देवरी आणि डॉ. साधना स्वामी (MBBS) यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

देवरी 07: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे ‘कॅन्सर वर बोलू काही’ जनजागृती कार्यक्रम लायन्स क्लब देवरी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. साधना स्वामी MBBS कलर्स हॉस्पिटल नागपूर , लायन्स क्लब देवरी चे चेयरपर्सन पिंकी कटकवार , पारस कटकवार अध्यक्ष लायन्स क्लब , सचिव आफताब शेख सदस्य लायन्स क्लब , प्राचार्य डॉ. सुजित टेटे , तारेश मेश्राम , मनोज मेश्राम , अनिल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या युगात लहानमुलांमध्ये कॅन्सर ( कर्करोगाचे ) प्रमाण वाढत असल्याचे बघावयास मिळते. विद्यार्थी जीवनात कॅन्सर रोगाबद्दल सविस्तर माहिती असावी , कॅन्सर पासून कसे वाचता येणार , कॅन्सर ची लक्षणे आणि उपचार यावर डॉ. साधना स्वामी यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी यावेळी डॉ. साधना स्वामी यांच्याशी कॅन्सर रोगाविषयी दिलखुलास चर्चा केली. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न विचारून उपचार आणि सतर्कतेची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमात उपस्थित अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आरोग्यदायी विद्यार्थी आणि आरोग्यदायी समाज घडविण्याचे संदेश दिले. सदर कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षका वैशाली मोहुर्ले यांनी केले आभारप्रदर्शन डॉ. सुजित टेटे यांनी मानले. यशासाठी शाळेतील शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share