चिचगड येथे आरोग्य उपकेन्द्राच्या भवनाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भुमिपूजन

■ आमदार कोरोटे यांनी या भवनाकरीता ३९लक्ष रूपये मंजूर केले

प्रतिनिधी /देवरी,ता०७: देवरी तालुक्यातील चिचगड येथे आरोग्य उपकेन्द्राकरीता मंजूर ३९ लक्ष रूपयाच्या निधीच्या भवनाचे भुमिपूजन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते रविवार (ता.२ आक्टोंबर ) रोजी पार पडले.
या प्रसंगी उपस्थित जि.प.चे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष सी.के बिसेन, जि.प.सदस्य राधिकाताई धरमगुळे,चिचगडचे सरपंच कल्पनाताई गोश्वमी, पं.स. सभापती अंबिकाताई बंजार, पं.स.सदस्य रणजित कासम, प्रल्हादजी सलामे, ग्रा.पं. सदस्य सदिंप कटकवार, साइनताई सय्यद, गुरनताई ,सामाजीक द्वारकाप्रसाद धरमगुळे, आ.वि.का. सह.संस्थाचे उपाध्यक्ष भुवन नवरे, वरिष्ठ कार्यकर्ता योगेशजी देशमुख, राजेश भाऊ बिंझलेकर, बबलू भाऊ पठाण, रोशन परिहार, आरतीताई जांगडे, युजेश बिसेन, पोलीस पाटील जगदीश नरवरे, सौ. जांगडे मॅडम, सौ.राऊतताई, खंडाते साहेब, सुभाष सोनवणे, उर्मिलाताई राऊत, सुरेश जनबंधू, योगराज नंदेश्वर यांच्यासह चिचगड परिसरातील कांग्रेस पक्षातील पदाधिकारी , कार्यकर्ता व गावकरी बहुसंख्येने उपस्थित गावकरी होते.#

Print Friendly, PDF & Email
Share