देवरी येथील “तरुण पंचशील दुर्गा उत्सव मंडळाकडुन जोपासण्यात आली सामाजीक बांधीलकी…..!

देवरी 07: तरुण पंचशील दुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकूची दरम्यान या मंडळानी देवरी येथील जामा मशीदी जवळ विर्सजन यात्रा पोहचताच सायंकाळच्या नमाजाची वेळ लक्षात घेता डीजे आणि संपुर्ण वाजागाजा पुर्णपणे बंद करून तेथील परीसरातून विसर्जन यात्रा शांततेत पुढे, वाढविण्यात आली. विशेष म्हणजे हया मंडळाच्या सोनु शाहु, ओमप्रकाश रामटेके, दिपक लांजेवार , लक्ष्मण ब्राम्हणकर आणि इतर सदस्यांनी निर्णय वेळेवर घेऊन विसर्जन यात्रा शांततेत समोर नेली. यामुळे मुस्लीम बांधवानी ‘तरुण पंचशील दुर्गा उत्सव मंडळाने सामाजीक बांधीलकी जोपासली असे कौतुक करून ह्या मंडळाचे आभार मानले आणि असेच सामाजिक कार्य मंडळाकडुन घडत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share