देवरी दसरा उत्सव समिती साजरा करणार थाटात दसरा महोत्सव 2022
◾️भव्य शोभायात्रा आणि 51 फुटाच्या रावण पुतळ्याचे होणार दहन
प्रा. डॉ. सुजित टेटे
देवरी 03: दसरा उत्सव समिती द्वारा यावर्षी दसरा महोत्सव थाटात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून देवरी येथील क्रीडांगणावर सायंकाळी भव्य शोभा यात्रा , फटाके आतिषबाजी आणि रंगारंग कार्यक्रमाने दसरा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली आहे.
सदर दसरा उत्सव समिती दरवर्षी हा सण साजरा करीत असून यामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा सहकार्य असतो.
१) आफ़ताब शेख़
२) पारस कटकवार
३) शेंकी भाटिया
४) हमीद मेमन
५)अर्पित जैन
६) रतनेश असाटि
७) काक्के भाटिया
८) अंशुल अग्रवाल
९) गोपाल तिवारी
१०) शूरेश साहु
११) राजेश साहु
१२) युवराज मेश्राम
१३) प्रवीण दहिकर
१४) विजय गहाने
१५) सचिन बावरिया
१६) रितेश अग्रवाल
१७) भूषण मस्करे
१८) अमित गुप्ता
१९) अनिल येरणे
२०) पुष्पकुमार गांगबोईर
२१) आशीष अंबिलकर
२२) यादव पंचमवार
२३) विनोद गभने
हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.
निश्चितच यावर्षीच्या दसरा उत्सवाची देवरीकर आतुरतेने वाट बघत आहेत.