सिविल लाईन दुर्गा उत्सव मंडळ देवरी तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे देवरी गौरव पुरस्कार देऊन सत्कार

प्रा. डॉ. सुजित टेटे

देवरी 03: सिविल लाईन दुर्गा उत्सव मंडळ देवरी आपले 34 वे वर्ष साजरे करीत असून विविध सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाद्वारे नवरात्री निम्मित करण्यात आले.

याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या मान्यवरांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले. यामध्ये अशोक बनकर (अप्पर पोलीस अधिक्षक, देवरी) , के.सी. शहारे (सेवानिवृत्त प्राचार्य म. भा. पटेल महाविद्यालय, देवरी) , मनिष शहारे (सहाय्यक अभियंता विजवितरण, देवरी), डॉ. अमितजी येडे, देवरी, नितीन शिरपुरकर (पोलीस नायक, देवरी), रोशन डोहळे (पोलीस शिपाई, देवरी), हेल्पिंग बॉईज ग्रुप, देवरी, डॉ.अतुल पवनकुमार अग्रवाल, देवरी, डॉ.प्राची विनोदकुमार अग्रवाल, देवरी, शाहिद पठाण (वृत्त वाहिनी रिपोर्टर), यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच स्त्री शक्ती पुरस्कार- कु.देवीका शाहु आणि श्रीमती संगीता गेडाम प्रा. डॉ. वर्षा गंगणे (म. भा. पटेल महाविद्यालय, देवरी) यांचे कडून देण्यात आले.

यावेळी दुर्गा उत्सव मंडळ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share