गोंदिया 04: जिल्ह्यात प्रवेश केलेल्या जंगली हत्तींनी नवेगावबांध वनपरिक्षेत्रात इसमाचा पहिला बळी घेतल्याची घटना आज मंगळवारला (दि.4) सकाळी उघडकीस आली आहे.
नवेगावबांध वनपरिक्षेत्रातिल (तालुका मोरगाव अर्जुनी ) आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास तिडका – जब्बारखेडा गावाजवळ काही शेतकऱ्यांनी हत्तिंचा मार्ग अडवून हळकावण्याचा प्रयत्न केला, त्यातच हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला व एक जखमी झाला आहे.या जंगली हत्तीच्या हल्ल्यात सुरेंद्र जेटू कळहीबाग (वय 52) यांचा मृत्यूू झाला आहे.तर जोरू सुंदरसिंग पोरीची(वय 50) हा इसम जखमी झाला असून राहणार तिडका येथील आहेत.रात्रीला जब्बारखेडा परिसरात हत्तींचा कळप असताना ढोलताशे वाजवून या कळपाला परतवून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.तर माहितीनुसार सदर हत्तीचा कळप हा नागझिरा जंगलाकडे येण्याचा प्रयत्न करीत असून नागरीक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करीत असल्याची चर्चा आहे.








