‘बारामती पॅटर्न’नी तालुक्यात शेती विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार : जिप सदस्य उषाताई शहारे

देवरी 28: माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती अंतर्गत संपूर्ण राज्यात चालविण्यात येणारा प्रकल्प विषयी देवरी येथील पंचायत समिती मध्ये उषाताई शहारे जी. .सदस्य , राधीकाताई धर्मगुडे जि . .सदस्य चिचगड, प्रर्भारी खंडविकास अधिकारी दिपक ढोरे, माऊली ग्रीन आर्मी महा.राज्य. च्या अध्यक्ष मनीषा नागलवडे यांच्या उपस्थितीत चर्चा संपन्न झाली.

बारामती पॅटर्नमुळे देवरी सारख्या तालुक्यात शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे योजना, महिलांसाठी रोजगाराच्या योजना ह्या संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. लवकरच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिप सदस्य उषाताई शहारे यांनी यावेळी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share