जुगार अड्डयांवरील धाडीत 4.13 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामनगर व गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दित सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत 16 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 12 हजार 970 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. उल्लेखनीय म्हणजे एका घटनास्थळावरून 4 आरोपी फरार झाले. ही कारवाई 24 व 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या सचनेवरून अवैध दारू विक्री जुगार, सट्टापट्टी आदी अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्याची मोहिम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतली आहे. मिळालेल्या सुचनेनुरुप गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील इर्री गाव शिवाराच्या महादेव पहाडीवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालण्यात आली. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी विवेक बिरिया (29) रा. सावराटोली, शेखर ठकरेले (23), अतुल मेश्राम (29) रा. कुडवा, आस्तिक भेलावे (23), संतोष उके (25) रा. कटंगीकला, सचिन मेश्राम (30) रा. चावडी चौक या 6 आरोपींना अटक करण्यात आली. तर किसन दमाहे रा.इर्री, मोहित रगडे रा.सावरटोली, ललीत मोहनकर रा.चुलोद व मोनू चव्हान रा.सूर्याटोला हे फरार झाले. घटनास्थाळावरून 8 मोबाईल, 3 मोटारसायकल तसेच 1 लाख 5 हजार 720 रुपये रोख असा एकूण 3 लाख 40 हजार 920 रुपयाचा रामनगर पोलिस मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसर्या कारवाईत रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत अंगूर बगिचा येथील जुगार अड्ड्यावर 25 सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून विजय बावणथडे, मुकेश अटरे (42), अमन बावणथडे तिन्ही रा. गजानन कॉलोनी, विवेक बारसे (52) रा. टिबीटोली, कैलास यादव (49) रा. यादव चौक, दिपेश वडीचार (34) रा. अंगूर बगीचा यांना रंगेहात अटक करण्यात आली. घटनास्थळावरून 54 हजार 9 50 रुपयासह 72 हजार 50 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकंदरीत दोन्ही घटनात 12 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 लाख 12 हजार 9 70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पोउपनि महेश विघ्ने, गोपाल कापगते, देशमुख, कोडापे, रियाज शेख, सोमेद्रसिंह तुरकर, विजय मानकर, संतोष केदार, श्याम राठोड यांनी केली.