????सावधान! देवरी बसस्थानकाच्या दूषित पिण्याच्या पाण्यामुळे हजारो विद्यार्थी आणि प्रवाशांचे जीव धोक्यात

◼️25 महिन्यापासून बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ झाली नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातुन उधळ

✍????प्रा. डॉ. सुजित टेटे / प्रहार टाईम्स

देवरी 29: नक्षलग्रस आदिवासी तालुका म्हणून देवरी तालुक्याची ओळख आहे. बहुतांश ग्रामीण भागाला जोडणारा देवरी येथील बस स्थानक केंद्रस्थानी असून जिल्हे तसेच राज्यांना जोडणारा बसस्थानक म्हणून देवरीची ओळख आहे. कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करून बस स्थानकाची इमारत उभी झाली परंतु हजारो प्रवाशी आणि विध्यार्थ्यांच्या आरोग्याशी राज्य परिवहन महामंडळ खेळ खेळत असल्याची माहिती माहितीच्या अधिकार कायद्यातून उघड झाली आहे. तब्बल 25 महिन्यापासून सदर बस स्थानकावरच्या पाण्याच्या टाकीची सफाई झाली नसल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या चालक , वाहक यांच्या जीवाशी देखील खेळ खेळला जात आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच साफसफाई कोण करतो आणि टाकी साफ सफाई करण्याचे नियम व अटी काय आहेत अशी माहिती देवरीचे माहितीचे अधिकार कार्यकर्ते असेच सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी माहिती विचारली असता त्यामध्ये शेवटी 4 ऑगस्ट 2020 ला पाण्याची टाकी साफ केल्याची नोंद आहे. त्यानंतर 2021 आणि सप्टेंबर 2022 पर्यंत अर्थात 25 महिन्यापासून कुठलीच साफ सफाई आणि स्वच्छता झाली नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

कोरोना काळात स्वच्छतेला प्रथम प्राध्यान्य देण्यात आले परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या देवरी बस स्थानकाच्या पाण्याची कोरोना काळात 2 वर्ष 5 महिने कुठलीच स्वच्छता झाली नसल्याने नाईलाजाने दूषित पाणी पीत असल्यामुळे हजारो प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र असून सर्वसामान्यांचे समस्या ऐरणीवर आले आहे.

विशेष म्हणजे मानवविकास अंतर्गत चालणाऱ्या बसेस द्वारे हजारो ग्रामीण विद्यार्थी याच बस स्थानकावरून येजा करतात , नागपूर , भंडारा , गोंदिया तसेच छत्तीसगड राज्याला जोडणारा महत्वाचा देवरी बसस्थानक असल्यामुळे हजारो प्रवाशीचे सुद्धा आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र आहे.

सदर प्रकरणामुळे दुर्लक्षित राज्य परिवहन महामंडळचे अधिकारी यांच्या वर कारवाई करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देवरी येथील सामाजिक कार्यकर्ता नरेश जैन यांनी केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें