हेल्पिंग बॉयजचे पाटील कन्स्ट्रक्शनला अल्टीमेटम, खड्डे बुजवा अन्यथा खड्यात बेशरम रोवू !

देवरी 20: राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण रस्ता बांधकाम नागरिकांसाठी जिवघेणा प्रवास ठरला असून देवरीते आमगाव महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. वनविभाग क्षेत्रातील रस्ते खोदकाम करून खड्डेमय असून दोन वर्षापासून कोणतीही दुरुस्ती नाही. त्याचा असह्य फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
देशात अनेक ठिकाणी सध्या मोठ्या संख्येने नवीन राष्ट्रीय महामार्गा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.त्याच धर्तीवर गोंदिया जिल्हा मधून राष्ट्रीय महामार्ग 543 चे काम गेल्या 3 वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.आमगाव ते देवरी या महामार्गावर अनेक ठिकाणी जंगल व्याप्त परिसर येत असल्याने अनेक ठिकाणी बांधकाम अपूर्ण आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना करावा लागत आहे. वनविभागाची परवानगी आवश्यक असताना सुद्धा संबधित कंपनीने दुर्लक्ष करीत त्याभागात खोदकाम केले.मात्र आजही त्या रस्त्याची कोणत्याची प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

आमगाव- देवरी मार्गावरील वडेगांव येथील रस्त्यावरील खड्डे भरून काढण्यासाठी हेल्पिगं बॉईज ग्रुपने दिनांक २६/०९/२०२२ रोज सोमवार पर्यंत या समस्येचा निवारण करण्यात यावे असे निवेदन पाटील कन्स्ट्रक्शनला दिले आहे .

२६/०९/२०२२ रोज सोमवार पर्यंत या समस्येचे निवारण झाले नसल्यास २७/०९/२०२२ रोज मंगळवार ला सकाळी ९ वाजता हेल्पिंग बॉईज ग्रुप चे युवासदस्य व वडेगांव ग्रामस्थ मिळून त्याच खड्ड्यामध्ये बेसरम वृक्षाचे रोपण करून प्रदर्शन करण्यात येईल असे चक्क अल्टिमेटम दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share