सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बारसागडे यांचा नागपूर येथे सत्कार

■ डॉ. बारसागडे यांनी शिक्षणक्षेत्रासह कोवीड -१९ मध्ये दिलेल्या विशेष सेवा सहकार्या बद्दल रोटरी क्लब द्वारे सत्कार

देवरी 18: तालुक्यातील बोरगांव/बाजार येथील शासकिय आश्रमशाळा आणी एकलव्य माँडेल रेसिडेंशियल स्कूल(सी.बी.एस.ई.) चे सेवानिवृत्त प्राचार्य तथा रोटरी क्लब पश्चिम नागपूरचे रोटरीयन डॉ. जगदीश बारसागडे यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षणक्षेत्रासह कोवीड-१९ मध्ये दिलेल्या विशेष सेवा व सहकार्याबद्दल मंगळवारी रोजी रोटरी क्लब पश्चिम नागपूर च्या वतीने डि.जी.ई. खोजेन्द्र खुराणा यांच्या हस्ते स्नेहप्रेम भेटीसह सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बारसागडे सह एकूण १८ शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सत्कार कार्यक्रमात रोटरी क्लबचे प्रात:पाल गजानन रानडे,प्रोजेक्ट सेक्रेटरी पंकज गडकरी, प्रशासन सेक्रेटरी ऋषीकेश गुप्ते, आपथँलमोलाजीकल सोसायटी (ओ.एस.एन.) चे प्रेसिडेन्ट डॉ. नेहा देशपांडे, सेक्रेटरी डॉ. रोहीणी जुनेजा यांच्यासह रोटरी क्लब पश्चिम नागपूर चे सर्व सदस्यगण बहुसंख्येने उपस्थित होते.
या सत्कार बद्दल आँल इंडिया टिचर वेलफेयर असोसिएशन(भारत), आदिवासी विकास विभाग(म.रा.),शासकिय पेन्शनर्स संघटना(म.रा.),वर्ड कान्शीटयूशन अँड पारलियमेन्ट असोसिएशन,वर्ड ग्लोबल पूल,वर्ड इनव्हायरमेन्ट,डिफेन्डर असोसिएशन, इंटरनेशनल पीस क्राप्स असोसिएशन,इंटरनेशनल ह्यूमन राईटस् असोसिएशन,द रोटरी इंटरनेशनल फाउंडेशन(यू.एस.ओ.) नवी दिल्ली व मित्र परिवारांनी डॉ. जगदीश बारसागडे यांचे अभिनंदन करून पुढच्या यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

Share