नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यांचे वाटप

देवरी 18: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त देवरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवरी येथील दंडकारण्य विद्यालयात नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता केक कापून अपंग विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सचिव संजय पुराम, भंडारा – गोंदिया जिल्हा संघटक वीरेंद्र अंजनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सचिव यादोराव पंचमवार, तालुकाध्यक्ष अनिल येरने, तालुका महामंत्री विनोद भांडारकर, प्रवीण दहीकर, बालकल्याण सभापती सविता पुराम, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजु शाहू, नगर पंचायतचे नगराध्यक्ष संजु उईके, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष प्रज्ञा संगिडवार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंदरजितसिंग भाटिया, महामंत्री नितेश वालोदे, दिनेश भेलावे, विनोद सूर्यवंशी, मनोज मिरी, नगर पंचायतचे सभापती संजय दरवडे, महिला व बालकल्याण सभापती तनुजा भेलावे, नगरसेवक रितेश अग्रवाल, नगरसेविका नूतन कोवे, सीता रंगारी, कमल मेश्राम, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गुरनुले, गणेशसिंह गहेरवार, अनुसूचित जाती आघाडीचे तालुकाध्यक्ष राष्ट्रपाल राऊत, भाजप विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दिपक शाहू, महामंत्री हितेश हटवार, कोषाध्यक्ष राहुल मडावी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share