पोलिस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल

गोंदिया: पतीच्या अनैसर्गिक लैंगिक छळ व हुंड्यासाठी होत जाचाला त्रासून एओपी कार्यालयात कार्यरत पोलिस उपनिरीक्षका विरूद्ध पत्नीने केशोरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. इमरान मुल्ला असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी केशोरी पोलिसांनी आरोपी इमरान मुल्ला याला अटक केली आहे. इमरान मुल्ला याला अर्जुनी मोर न्यायालयापुढे सादर केले असता जामीन मिळाले आहे. न्यायासाठी पिडीत महिलेन जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे दाद मागीतली आहे.

प्राप्त माहिती नुसार सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी इमरान बाबाजी मुल्ला हा पोलिस विभागात भरनोली एओपीमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. 4 वर्षांपूर्वी इमरान मुल्लाचे लग्न कर्नाटक राज्यातील आफरीनशी धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे झाले. मात्र मुल्ला याचे लग्नापूर्वीच एका महिलेसोबत संबंध असून त्यांचे एक अपत्यही असल्याची बाब पुढे आली. या प्रकरणी आफरीन हिने आरोपी इमरान मुल्ला व त्याच्या कुटूंबाला जाब विचारला. मात्र, उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली. यानंतर मुल्ला व याच्या कुटुंबाने हुंड्यासाठी आफरीनचा शारीरिक व मानसिक छळ केला.

या प्रकरणाची तक्रार पिडीतेने तत्कालीन पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली होती. सातत्याने होत असलेल्या जाचाला कंटाळून 1 सप्टेंबर रोजी आफरीन हिने जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांची भेट घेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानुरूप केशोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द कलम 377, 498 अ, 509, 323, 504, 506, 34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीने केशोरी पोलिसांपुढे आत्मसर्मपण केले. अटकेनंतर केशोरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला जामीन दिला.

Print Friendly, PDF & Email
Share