आरटीई फाउंडेशन इंडिया जिल्हा गोंदिया च्या देवरी तालुका अध्यक्ष पदावर अनिल येरने तर सचिव पदावर सुरेश चन्ने यांची निवड

देवरी :- आरटीईची तालुका सभा आयोजित करण्यात आली. सभा अध्यक्ष स्थानी आरटीई फाउंडेशन इंडिया जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे हे होते. उपरोक्त सभेत अध्यक्ष यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अनिल झेड. येरणे सी. एस . इंग्लिश पब्लिक स्कूल देवरी यांची अध्यक्ष पदावर तर सुरेश जि. चन्ने सरस्वती शिशु मंदिर देवरी यांची सचिव पदावर तसेच डॉ. सुजित टेटे प्राचार्य ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. उपरोक्त सभामध्ये खाजगी कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळेची वंचित व दुर्बल घटकातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिल्लक असलेल्या शैक्षणिक शुल्कवर चर्चा करण्यात आली. तसेच जुन्या शाळेतून टीसी न घेऊन जाता दुसर्‍या शाळेत कसे प्रवेश दिले जाते याचे समाधानकारक मार्ग कसे काढता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी यांनी पालकांकरिता टीसी काढण्याची एक ठराविक कालावधि निश्चित करून जुन्या शाळेची शिल्लक असलेली शुल्क जमा केल्यानंतर टीसी पालकांना देण्यात यावी, यावर विचार करण्यात आले. सभेचे अध्यक्ष प्रा. आर डी कटरे जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये खाजगी शाळेला असलेल्या समस्या व त्याचे निराकरण आपल्याला कशा प्रकारे करता येईल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आरटीई बद्दल असलेल्या अडचणी संस्था संचालकांना सांगितले व आरटीई फाउंडेशन च्या कार्याची जाणीव त्यांनी करून दिली. सभेला अनिल येरने, डॉ. सुजितजी टेटे, अश्विन पिल्लई हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share