महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांना‘महाराष्ट्र कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित

प्रा.डॉ. सुजित टेटे /प्रहार टाईम्स

देवरी 11: गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांना ‘महाराष्ट्र कार्यगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ‘ऑन धिस टाईम मीडिया’ डिजिटल पोर्टल द्वारे हे पुरस्कार देण्यात आले आहे.

‘ऑन धिस मीडिया’ विदर्भ विभागाच्या माध्यमातून रविवार, 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल ली मेरेडियन, वर्धा रोड, मिहान फ्लायओव्हर समोर, नागपूर येथे ‘महाराष्ट्र कार्यगौरव’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. समाजातील कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी निवड समितीने यांची निवड केली आहे.

सदर पुरस्कार नाम फाऊंडेशनचे संस्थापक सिने अभिनेते मकरंद अनासपुरे , सुधीर मुनघंटीवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. या सोहळ्याला माजी आमदार संजय पुराम यांच्या सह सविता पुराम सहभागी झाल्या होत्या. यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share