देवरी 10:- तालुका अति दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे मोबाईल टॉवरचे प्रमाण कमी आहे. तसेच सर्व ग्राम पंचायत शाळा आ अंगणवाडी येथे इंटरनेट उपलब्ध होत नसल्याने विकासाचे कामात अळथळा निर्माण होत असल्यामुळे ग्राम पंचायत मैसूली आणि ग्राम पंचायत सुकडी येथे मोबाईल टॉवर लावण्याबद्दल चे निवेदन देवरी पंचायत समितीचे सभापती अंबिका बंजार यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना दिले आहे.








