महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांना‘महाराष्ट्र कार्यगौरव’ पुरस्कार जाहीर

प्रा.डॉ. सुजित टेटे /प्रहार टाईम्स

देवरी 10: गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बबालकल्याण सभापती सविता पुराम यांची नुकतीच ‘महाराष्ट्र कार्यगौरव’ पुरस्कारासाठी निवड झाली असून ‘ऑन धिस टाईम मीडिया’ डिजिटल पोर्टल द्वारे हे पुरस्कार देण्यात येणार आहे.

‘ऑन धिस मीडिया’ विदर्भ विभागाच्या माध्यमातून रविवार, 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल ली मेरेडियन, वर्धा रोड, मिहान फ्लायओव्हर समोर, नागपूर येथे ‘महाराष्ट्र कार्यगौरव’ पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. समाजातील कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी निवड समितीने यांची निवड केली आहे.

सदर पुरस्कार नाम फाऊंडेशनचे संस्थापक सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. या सोहळ्याला आपल्या कुटुंबासह उपस्थित राहण्याचे पत्र सविता पुराम यांना प्राप्त झाले आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सविता पुराम यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share