देवरी येथे रास गरबा शिबिराला सुरुवात

◼️ए क्रोझ डान्स अकॅडमी द्वारे दांडिया प्रशिक्षण आयोजित

देवरी 09: गणपती उत्सवाबरोबरच नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र देवरी येथे बघावयास मिळत आहे. विविध संस्थेच्या माध्यमातून रास गरबा प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून देवरी येथील नृत्यू कला केंद्रांनी आपली कंबर कसलेली दिसते.

यामध्ये ए क्रोझ डान्स अकॅडमी द्वारे दांडिया प्रशिक्षण आयोजित करण्यात आला असून प्रशिक्षण फीस 500/- ठेवलेली आहे. 7 सप्टेंबर पासून 26 सप्टेंबर पर्यंत सायं 4 ते 7 च्या दरम्यान प्रशिक्षण मिळणार असल्याचे सांगतले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share