प्रेमाचे गणित

कवि – सुदर्शन महादेवराव लांडेकर
देवरी 9420191985

तुला माझ्या प्रेमाचे गणित कधी समजलेच नाही
मी प्रेमात बेरीज करीत होतो
तू मात्र प्रेमात वजाबाकी करीत राहलीस
मी माझ्या प्रेमासाठी गुणाकार करीत राहलो
तू नेहमीच प्रेमात भागाकार करीत होतीस…

तुला माझ्या प्रेमाचे गणित कधीच कळलेच नाही
मी माझ्या प्रेमाला वाचविण्यासाठी मसावि करत राहिलो
तू मात्र प्रेमाला तोडण्यासाठी लसावि करीत राहलीस
मी तूझ्या जवळ येण्यासाठी अंतर सेंटीमीटर करत होतो
तू मात्र दूर जाण्यासाठी अंतर किलोमीटर करीत राहलीस….

तुला माझ्या प्रेमाचे गणित कधी उमजलेच नाही
मी तुझा साथ टिकवून ठेवण्यासाठी प्रेम क्विंटल प्रमाणे केल
मात्र तू माझ्या प्रेमाला लाथडून प्रेम किलो प्रमाणे केलीस
मी तूझ्या भेटीसाठी विमानाच्या वेगाने येत गेलोय
पण तू मात्र माझ्या भेटीसाठी कासवाची गती ने येत गेली

तुला माझ्या प्रेमाचे गणित……..

Print Friendly, PDF & Email
Share