देवरी 30: तालुक्यातील चारभाटा येथील रहवासी सुनील मेघश्याम बहेकार यांच्या मालकीची गाय डोंगरगाव सावली जंगल परिसरात चरत असतांना वन्यप्राण्यांच्या हल्यात ठार झाली आहे. सदर घटनेची माहिती वनविभाग देवरी यांना देण्यात आली असून वनविभागाने पंचनामा केलेला आहे. परंतु कोणत्या प्राण्याच्या हल्यात गाय ठार झाली हे कळू शकले नाही.









