ग्रामीण भागात हरितालिका उत्साहात साजरी, पतीच्या दीर्घायुष्यसाठी सौभागिनीचे गौरीचे उपवास

देवरी 30: पतीच्या दीर्घायुष्यसाठी सौभागिनीचे गौरीचे उपवास करीत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात हरितालिका उत्साहात साजरी करण्यात आली. सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी गौरी मातेचे उपवास केले. ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी अतिशय उत्साहात हरितालिका साजरी केली असून महिलांनी सकाळी गौरीचे पूजन करून तलाव आणि नदीच्या काठी जाऊन जाऊन विधिवत पूजन करून गौरी चे आपल्या घरी स्थापना केली. आपली भारतीय संस्कृती टिकविण्याचे संदेश यावेळी सौभग्यावतीने दिले.

तालुक्यातील ग्रामीण भागात हरितालिका उत्साहात साजरी केली जाते. पाश्चिमात्य संस्कृती मुळे शहरी भागातील महिला संस्कृती ला विसरत असल्याचे चित्र असतांना ग्रामीण भागात परंपरा जपण्याचे संदेश दिले जात आहे.

Share