शेतक-यांच्या विविध मागण्यांन संदर्भात देवरी तालुका कांग्रेसचे निवेदन
■ सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास दिला तीव्र आंदोलनाचा ईशारा
देवरी,ता.२९: महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार देवरी तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने मागील दिवसात जिल्ह्यासह देवरी तालुक्यात अतिवृष्टी मुळे व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संबंधात कांग्रेस पक्षाने विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवार ( ता.२९ आगस्ट ) रोजी देवरीचे तहसीलदार अनिल पवार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले.
दिलेल्या निवेदनात कांग्रेस पक्षाने म्हटले आहे की, धान खरेदी केन्द्रावर ज्या शेतक-यांचे रब्बी धानाचे आनलाईन नोंदणी करण्यात आले आहे. त्या सर्व शेतक-यांचे धान शंभर टक्के खरेदी करा, धान खरेदी केन्द्रावर विक्री केलेल्या धानाचे चुकारे त्वरीत दया, अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे शेतक-यांच्या धानाचे तसेच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या करिता त्यांना पन्नास हजार रूपये प्रति हेक्टर आर्थिक मदत त्वरीत करा, अतिवृष्टीमुळे पडलेल्या घर धारकांना दिड लक्ष रूपयेत्वरीत आर्थिक मदत करा तसेच नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना त्वरीत प्रोत्साहन राशी दया अशाप्रकारच्या मागण्यांचा यात समावेश आहे.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात कांग्रेस पक्षाचे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया,माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, जि.प.सदस्य राधीकाताई धरमगुळे, पं.स. सदस्य भारतीताई सलामे, नगरसेवीका सुनीताताई शाहू, नगरसेवक मोहन डोंगरे, नितीन मेश्राम, शकील कुरैशी, सरपंच कविताताई वालदे, माजी जि.प.सदस्य माधुरीताई कुंभरे,जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, युवक कांग्रेस चे विधानसभाध्यक्ष दिपक(राजा) कोरोटे, माजी पं.स.सदस्य ओमराज बहेकार, राजेश गहाणे, नितीन धुर्वे, कमलेश पालीवाल, सुभाष मेळे, रतन राऊत, रोहीत नेताम, नरेश राऊत, द्वारकाप्रसाद धरमगुळे, ग्रा.पं सदस्य साईन सय्यद, तेजराम भोयर, शिवचरण शहारे, चंद्रपाल भैसारे, तेजराम राणे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतक-यांचा समावेश होता.