जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ब्लॉसम चा कुणाल चुटे अव्वल

देवरी 29: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल चा विद्यार्थी कुणाल चुटे यांनी नुकतीच झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत बाजी मारली असून त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.

आज राष्ट्रीय क्रीडा दिनी त्याला शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी सन्मानित केले असून या आधीसुद्धा योगासन स्पर्धेत कुणाल चुटे यांनी बाजी मारली आहे.

कुणाल याने आपल्या यशाचे श्रेय योग शिक्षक रोहित ब्राह्मणकर , आई वडील आणि शिक्षकांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share