देवरी तालुक्यातील ओवारा गावात नंदी बैलांची मूर्ती स्थापना

◼️पोळा निमित्त नंदीच्या मूर्तीची स्थापना

देवरी 29: तालुक्यातील टोकावर निसर्गाच्या सानिध्यात डोंगर भागात वसलेल्या ओवारा गावात नंदी बैलांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी सरपंच हिरामण टेकाम , उपसरपंच कमल येरणे , प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुजित टेटे , चंद्रशेन रहांगडाले , तंटा मुक्त समितीचे देवेंद्र डोये ,पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तान्हापोळा उत्सव समिती द्वारे दरवर्षी तान्हापोळाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी यानिमित्ताने नंदिबैलांची मूर्ती गावाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्थापन करण्यात आली असून गावाच्या सुशोभीकरणासह शेतकरी आणि बैलांना कृषिप्रधान देशात अनन्यसाधारण महत्व आहे असे संदेश यावेळी देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गोपाळकाला करून झाली त्यानंतर नंदीबैलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. फित कापून आणि विधिवत पूजा अर्चना करून कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी श्रीराम लांजेवार ,भाऊदास बिंझलेकर , मोतीराम मेहर , प्रभु पंचभाई, खुमराज टेटे यांनी सहकार्य केले.

Share