चालत्या रुग्णवाहिकेचे चाक निघाले

गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथे चालत्या रुग्णवाहिकेचे मागचे चाक अचानक निघाल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी घडली. सुदैवाने या कोणतीही दुर्घटना झाली नाही.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनीराम कांबळे (62) या रुग्णाला ऑक्सिजन लावून 108 या रुग्णवाहिकेतून नागपूरला पुढील उपचारासाठी घेऊन जात होते. रुग्णवाहिकेत रुग्णासह चालक, एक डॉक्टर व इतर चार लोक बसले होते. दरम्यान तुमखेडा शिवारात अचानक रुग्णवाहिकीचे एक चाक निघाले. अपघातानंतर रुग्णवाहिका तब्बल 100 मिटरपर्यंत तीन चाकावर धावत गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान एका तासानंतर दुसरी रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णाला नागपूरला पाठविण्यात आले.

Share