देवरीच्या लाकडी बैलांना तान्हा पोळयात जिल्ह्याभर मागणी

■ येथील सखी पेंटर या कलाकाराने तैयार केले चार फुट पर्यंत उंचीचे लाकडी बैल

■ २५० च्या जवळपास लाकडी बैलांची विक्री

देवरी 29: हौसेला मोल नसते असे म्हणतात. अलीकडे प्रत्येकाला वाटते काही ना काही वेळ गळे आणी भव्यदिव्य करावे म्हणून अशाच एक प्रकार केला देवरीच्या मनोज नंदेश्वर (सखी पेंटर) या कलाकाराने. यांनी तान्हा पोळ्याकरिता चक्क चार फुट उंचीचा लाकडी बैल तैयार करून ३० हजारात विक्री केले. अशाच प्रकारे २५० च्या जवळपास लहान मोठे नंदी बैल तैयार करून देवरी परीसरासह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विविध गावात विक्री केले.
मनोज नंदेश्वर ( सखी पेंटर) यांनी एकसंघ लाकडा पासून हे नंदी बैल तैयार केले. यामध्ये एकाच लाकडावर कोरीवकाम केले. या कलाकाराने खुप बारकाईने कलाकुसर केल्याने अगदी हुबेहुब वाटावा असा चार फुट उंची चा नंदी बैल बनविला. हा नंदी बैल भंडारा जिल्ह्यातील लाखनी नजीकच्या पोहरा या गावी विकण्यात आला. हा नंदी बैल तान्हा पोळ्याच्या दिवसी आकर्षणाचा केन्द्र ठरला आहे.
तान्हा पोळ्यात बच्चे कंपनी आपआपली नंदी बैल घेवून नजीकच्या मंदीर परिसरात किंवा चौकाचौकात जाऊन तेथे आयोजीत आकर्षक नंदी बैलाच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार ही देण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता.
मागील दोन वर्ष कोरोना मुळे ही स्पर्धा बंद होती. आता पर्यंत या धंद्यात मंदी पसरलेली होती. मात्र या वर्षी सर्व बंदी हटल्याने तसेच बैलांसाठी लागणारे लाकूड व रंगकामाचे साहित्य देखील महागल्याने या लाकडी बैलांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. लाकडी बैल हा छोटा असो किंवा मोठा त्यासोबतची सजावट इतरांपेक्षा सरस ठरावी याकडेच बच्चे कंपनीचे लक्ष असते. म्हणूनच लाकडी बैलाला सजवणारी सर्व साहित्य खरेदी करून उत्तम सजावट करण्यात आले. त्यामुळे लहान पासून मोठ्या नंदी बैलाची किंमत २०० ते ३० हजार रूपये पर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तरीही हा तान्हा पोळा सण उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कायम होता. देवरी परीसरासह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात येथून तैयार केलेले लाकडी नंदी बैलाची चांगली मागंणी असल्याने त्यांनी हे लाकडी बैल खरेदी केली. असे कलाकार मनोज नंदेश्वर (सखी पेंटर)यांनी सांगीतले.

Share