देवरी: पोळा साजरा करतांना सरपंचाच्या पतीचा दगडाने डोका फोडला , प्रकृती गंभीर

◼️देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना

देवरी 27: तालुक्यातील ग्रामीण भागात आज पोळा सण साजरा करण्यात आला शेतकरी आपल्या बैलांना उत्साहात तोरणात घेऊन घेले बैलांची पूजा आणि झडती सुरु असतांना डोंगरगाव येथील सरपंचा श्रीमती बारसे यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला अजून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

प्राप्त माहिती नुसार प्रत्यक्षदर्शी च्या माहितीनुसार पोळा साजरा करते वेळी दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि हाणामारी सुरु झाली. सरपंचाचे पती सुभाष बारसे मध्यस्ती करून वाद मिटवीत असतांना अचानक एका इसमाने दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.त्यांना उपचारासाठी गोंदियाला हलविल्याचे बोलले जात असून सालेकसा पोलीस संबंधित घटनेचा तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share