‘पर्यावरण वाचवा भविष्य घडवा’ संदेश देत धुकेश्वरी मंदिरात तान्हा पोळा उत्साहात साजरा

◼️ पर्यावरण पूरक संदेशाने नंदीबैलाचा तान्हापोळा उत्साहात साजरा

देवरी 27: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देवरी येथील धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दुपारी ०४ : ०० वाजता बालगोपाळासाठी तान्हा पोळा निमीत्त नंदी बैल सजावट आणि वेशभूषा स्पर्धा आयोजीत करण्यात आले होते.
यात नंदी बैल सजावट आकर्षक असलेल्यांना प्रथम क्रमांक बक्षीस पतीरामजी शेंद्रे यांच्याकडून १००१/- रुपये, द्वितीय बक्षीस शिवकुमारजी परिहार यांच्याकडून ७०१/- रुपये आणि तृतीय बक्षीस शंकरलालजी अग्रवाल यांच्याकडून ५०१/- रुपये.
उत्तम वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक बक्षीस शर्मा दूध डेअरी यांच्याकडून ७०१/- रुपये, द्वितीय बक्षीस कुवरलालजी भेलावे यांच्याकडून ५०१/- रुपये आणि तृतीय बक्षीस बाबुरावजी क्षीरसागर गुरुजी यांच्याकडून ३०१/- रुपये देण्यात आले.
सहभागी झालेल्या सर्व बाळगोपाळाना भय्यालालजी चांदेवार आणि छोटेलालजी बिसेन यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
सदर कार्यक्रमात देवरी नगरीतील बालगोपाळ आणि त्यांचे नंदी बैल उत्साहात सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share