आज देवरीत पोळा निमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन
Prahar Times
देवरी 26- दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात २६ आणि २७ ऑगस्टला पोळा व तान्हा पोळा निमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात २६ ऑगस्ट शुक्रवारला दुपारी ०२ वाजता शेतकऱ्यांनी आपापल्या बैल जोड्यांना सजवून धुकेश्वरी मंदिरात आणल्यानंतर नाचत गाजत नगर पंचायतच्या पटांगणावर नेण्यात येतील. तिथे बैलांचा मुख्य पोळा आयोजीत केला असून उत्तम सजावट तथा आकर्षक असलेल्या बैल जोडीस आमदार सहषराम कोरोटे यांच्याकडून प्रथम बक्षीस म्हणून ५००१/- रुपये, द्वितीय बक्षीस माजी आमदार संजय पुराम यांच्याकडून ३००१/- रुपये आणि तृतीय बक्षीस पवन कटकवार यांच्याकडून २००१/- रुपये देण्यात येईल.
२७ ऑगस्ट शनिवारला दुपारी ०४ : ०० वाजता धुकेश्वरी मंदिरात तान्हा पोळा नंदी बैल सजावट आणि वेशभूषा स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. यात नंदी बैल सजावट आकर्षक असलेल्यांना प्रथम बक्षीस १००१/- रुपये पतीराम शेंद्रे यांच्याकडून, द्वितीय बक्षीस शिवकुमार परीहार यांच्याकडून ७०१/- रुपये आणि तृतीय बक्षीस ५०१/- रुपये शंकरलाल अग्रवाल यांच्याकडून देण्यात येईल. तर, उत्तम वेशभूषा असलेल्या बाळगोपाळाना प्रथम बक्षीस ७०१/- रुपये शर्मा दूध डेअरी कडून, द्वितीय बक्षीस ५०१/- रुपये कुवरलाल भेलावे यांच्याकडून आणि तृतीय बक्षीस ३०१/- रुपये बाबुराव क्षीरसागर गुरुजी यांच्याकडून देण्यात येणार आहे.
पात्र असलेल्या प्रथम श्रेणीतील दहापैकी सात बैल जोड्यांना संजय मलेवार गुरुजी कडून प्रत्येकी दोनशे रुपये तथा उपस्थित असलेल्या सर्व बैल जोडी मालकांना कुलदीप लांजेवार यांच्याकडून प्रत्येकी दुपट्टा देण्यात येईल. आणि सहभागी झालेल्या सर्व बाळगोपाळाना भय्यालाल चांदेवार तथा छोटेलाल बिसेन यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी वेळेवर जास्तीत जास्त संख्येने भाग घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार आणि इतर सर्व पदाधिकारी तथा सदस्यांनी केले आहे.