आ. मनोहर चंद्रिकापुरे यांची विधानसभा अध्यक्षाच्या तालीका सूचीवर झाली निवड

गोंदिया: आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाच्या तालीका सूचीवर निवड झाल्या नंतर अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्षाच्या अनुपस्थित अध्यक्षपदी विराजमान होण्याचे नियमित संधी मिळत असून ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी आपले संविधानिक ज्ञान व प्रशासकीय अनुभवाच्या वापर करून विधानसभेचे कामकाज सुचारू रूपात चालून विधानसभा अध्यक्षाची पद: प्रतिष्ठा व सन्मान राखण्यात यशस्वी होत असल्याचे असल्यास विधानमंडळात कामकाजावरून दिसून येते.

साधारणता दोन ते तीनदा विधानसभा सदस्य पद व विधानमंडळ नियमावलीच्या ज्ञान असलेल्या सदस्यांची विधानसभा तालीका अध्यक्षपदी निवड होत असते परंतु आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना पहिल्यांदाच आमदार असल्यावर तालिका अध्यक्षपदी निवड होऊन विधानसभेचे कामकाज चालवण्याची व आपले नैपुण्य दाखवण्याची संधी मिळाली आहे व संधीचे सोने करून सर्व पक्षाचे पक्षाच्या विधानसभा सदस्यांना सारखी वागणूक समान संधी देऊन त्यांच्या मागण्यांना न्याय देण्यात यशस्वी ठरत आहेत. याचे श्रेय अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे नागरिकांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास जाते.

Share