आजाराला कंटाळून मनमिवाळू पोलीस हवालदार महेश भुरे यांची आत्महत्या
◼️कुटुंबासह पोलीस खात्यातील मित्रपरिवारात शोककळा
देवरी 27 : पोलीस उपमुख्यालयात देवरी येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश भुरे यांनी देवरी येथे राहत असलेल्या घराच्या वराड्यांत स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पोलीस हवालदार महेश भुरे मागील 2 वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. आजाराच्या सततच्या वेदना त्यानां असह्य होत असल्याने त्यांनी रात्री ११.३० वाजता सुमारास देवरी येथे राहत असलेल्या घरातील वरांड्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या मागे 2 मुले, पत्नी आणि कुटुंब आहे. त्याचां अंतिमसंस्कार त्यांचे राहते गाव साकोली येथील मोक्षधामावर आज साय. ४.०० वाजता होणार आहे. सदर घटनेची नोदं देवरी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार नरेश गायधने करत आहेत.