Bhandara: 2वनरक्षक, 1वनमजूर आणि 1 खाजगी इसम एसीबी च्या जाळ्यात

◼️रेतीचा ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात मागितली 25 हजार रुपयांची लाच

भंडारा 25 : तक्रारदार यांचेकडे स्वतःचा ट्रॅक्टर असून ते रेती वाहतुकीचा व्यवसाय करतात. दिनांक 13/08/2022 रोजी आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदार यांचा ट्रॅक्टर पकडला व त्यांना ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 25 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्या नश्ल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभाग भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार पुरूष , वय 34 वर्षे, रा. श्रीराम नगर तुमसर, व्यवसाय शेती, यांच्या तक्रारीच्या आधारावर आज ही यसस्वी कार्यवाई करीत तब्बल ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात आरोपी नामे : 1) गणेश महाजन काकरवाल, वय 27 वर्ष, वनरक्षक, वर्ग 3, 2) मनीष उत्तम मेश्राम , वय 32 वर्ष, वनरक्षक, 3) केसरी रामासाव उचीबगले, वय 52 वर्ष, वनमजुर, रा. लोहारा, तिन्ही वनपरिक्षेत्र कार्यालय लेंडेझरी, तालुका तुमसर तर 4) मो. शहाबुद्दीन मो. दाउद अन्सारी, वय 19 वर्ष, धंदा मजुरी, नागपुर खाजगी इसम असे आहे.

आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी 25 हजार रुपये ची मागणी करून 3 हजार रुपये नगदी आणि 2 हजार रुपये ऑनलाईन पेमेन्ट द्वारे सुरवातीला स्विकारले आणि नंतर उर्वरित 20 हजार रुपयांची पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक 3 यांचे माध्यस्थीने तडजोडीअंती 15 हजार रुपयांची मागणी केली. दिनांक 24/08/2022 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आरोपी क्रमांक 4 यांचे हस्ते 15 हजार रुपये लाच रक्कम स्विकारून रकमेपैकी पाचशे रुपयांच्या 10 चलनी नोटा असे एकूण 5 हजार रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 10 हजार रुपये च्या डमी नोटा तक्रारदार यांना परत केल्या. नमूद आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता आरोपी क्रमांक 3 यांच्या मध्यस्थीने तडजोड करून लाच रकमेची मागणी केली व आरोपी क्रमांक 4 यांचे हस्ते लाच रक्कम स्विकारल्याले पोलीस स्टेशन आंधळगाव, जिल्हा भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share