अवैध दारू विकणाऱ्या आरोपींना गडचिरोली न्यायालयाकडून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपीच्या घरी झाडाझडती केली असता २० लिटर हातभट्टी मोहाची दारू मिळुन आल्याने अवैध दारू विकणाऱ्या आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंडात्मक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार 29 जुलै 2020 रोजी यातील आरोपी नामे गणेश सोहन मडावी वय 30 वर्ष सौ. फुलबत्ती गणेश मडावी वय 25 वर्ष, दोन्ही रा. मोहडोंगरी ता.जि. गडचिरोली यांनी घरी अवैधरित्या दारु बाळगुन विक्री करत असल्याचे मुखबिर कडून खबर मिळाल्याने पोस्टे गडचिरोली येथील सफो / अशोक कुमरे व सहकर्मचारी यांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता 20 लिटर हातभट्टी मोहा दारु किंमत 4 हजार रुपये चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष पंचनामा तयार करुन आरोपीता विरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद केला. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा / 1728 मुबारक शेख, पोस्टे गडचिरोली यांनी करुन आरोपीता विरूध्द भरपुर पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
आज 24 आगस्ट 2022 रोजी सी.पी. रघुवंशी, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचे न्यायालयाने आरोपी गणेश सोहन मडावी, सौ. फुलबत्ती गणेश मडावी दोन्ही रा. मोहडोंगरी ता. जि. गडचिरोली यास दोषी धरून कलम 65 (ई) महा. दा. कायदा अन्वये प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम 83 महा. दा. कायदा मध्ये प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. आणि दंड न भरल्यास 3 महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता राजकुमार उंदीरवाडे तसेच कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा / 1833 यशवंत मलगाम व कोर्ट मोहरर पोशी / 3391 हेमराज बोधनकर यांनी कामकाज पाहिले.