पारंपारिक नृत्यावर थिरकले सविता पुराम, परंपरा जपण्याचा दिला संदेश

◾️जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरीत आजच्या तरुण पिढीला दिला परंपरा जपण्याचा संदेश

डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी ०९:
आजच्या आधुनिकतेच्या युगात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आजच्या पिढीवर पडलेला दिसून येतो. ज्या परंपंरेने आपल्याला समाजात ओळख दिली , संस्काराचे धडे दिले त्याकडे आजची पिढी दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. यातच महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम आपली परंपरा जपण्याचा संदेश देत चक्क आदिवासी नृत्य कलाकारांसह ठेका धरून नृत्य केला आणि अभिमानाने आपल्या संस्कृतिचा दर्शन घडविला.

सविता पुराम यांच्या उत्साह बघून देवरी पंचायतसमितिचे सभापती अंबिका बंजार यांनी सुद्धा या पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरीत जल्लोष साजरा केला यावेळी आनंदाचा वातावरण निर्माण झालेला होता.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये देवरी तालुक्यातील आदिवासी बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.

Share