अति महत्वाचे: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आज राहणार बंद

गोंदिया : आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या अति वृष्टी मुळे होत असलेला धोका लक्ष्यात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवाव्या असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आदेश आहेत.

या निर्देशाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शाळा आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी बंद ठेवण्यात येत आहे. कोणताही विद्यार्थी शाळेत येणार नाही याची दक्षता घ्यावी.

शिक्षक/ग्रामसेवक यांनी हा संदेश सर्व गावांत पोहचवण्यासाठी व्यवस्था करावी असे आवाहन डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद गोंदिया व प्रदिप समरीत, शिक्षणाधिकारी माध्यमिक,जिल्हा परिषद गोंदिया यांनी केले आहे.

Share