देवरी पोलिसांची मोठी कारवाई , 47 किलो गांजा जप्त
देवरी 10: पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे यांचे आदेशान्वयेत आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात देवरी पोलिसांनी गांजा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. महामार्गावरून गांजाची वाहतूक करणारा वाहन क्र. MH 04-KU -4048 या वाहनात 47 किलो किंमत 4 लाख 75 हजार रुपये आणि वाहनांची किंमत 15 लाख रुपये असा मुद्देमाल शिरपूर चेक पोस्ट वर देवरी पोलिसांनी कारवाई करून जप्त केला आहे. गांजा तस्कर करणारा आरोपी नागपूर येथील असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.
या संबंधात देवरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, यांचे मार्गदर्शनात रेवचंद सिंगनजुडे पोलीस निरीक्षक देवरी, सपोनि नरेश उरकुडे सपोनि बहकार , पोशि रोशन डोहळे , पो शि मेंढे , पोशि कमलकिशोर चव्हाण यांनी सदरची कार्यवाही केली आहे.