विध्यार्थ्यांसाठी अखेर बस सेवा सुरु, सविता पुराम यांच्या प्रयत्नांना यश

◼️सभापती सौ. पुराम यांनी आगार प्रमुखांना निवेदनातून केली होती मागणी

देवरी 08: आदीवासी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग असलेल्या देवरी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये त्याचे शैक्षणिक कार्य सुरळीत व सुव्यस्थीत पणे पूर्ण व्हावे या दृष्टीकोणातुन सदर परिसर क्षेत्रात बस सेवा सुरु करण्यात यावे, असे निवेदन गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी जिल्हा आगार प्रमुख गोंदिया यांना दिले होते.

दररोज सकाळी ९.३० वाजता लोहारा, सुरतोली, फेऱ्या चारभाटा, सालेगांव, टेकाबेदर, पिंडकेपार, बोरगांव, या मार्गाने तर दुपारी ४.३० वाजता देवरी, बोरगांव, पिंडकेपार, साखरीटोला /सालेकसा टेकाबेदर, सालेगांव, चारभाटा, सुरतोली, लोहारा, या मार्गाने बस सेवा सुरु करण्यात यावे याप्रमाणे सदर परिसरात बस फेरी सुरु झाल्यास शालेय विद्यार्थ्याची धावपळ व शैक्षणिक नुकसान होणार नाही असे निवेदन सादर केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आज सकाळी 9 च्या सुमारास लोहारा बस स्टॉप येथून सविता पुराम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बस सेवेचा श्रीगणेशा करण्यात आला.

या सेवेचा फायदा ग्रामीण भागातील आदिवासी व गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना होणार असून जिल्हा परिषदेच्या सभापती सविता पुराम यांनी याची दखल घेत आश्वासन पूर्ण करून दाखविले आहे.

यावेळी जिप सभापती सविता पुराम सरपंच कैलास मरस्कोल्हे , पुरण मटाले , शिक्षक संजय अंबुले , गौतम महाराज , पोलीस पाटील , गावकरी , विध्यार्थी , बस चालक आणि वाहक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share