महागाई ,बेरोजगारी व अग्निपथ योजनेच्या विरोधात कांग्रेसचे निवेदन

देवरी,ता.०५ : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार, देवरी तालुका कांग्रेसच्या वतीने केन्द्रातील मोदी सरकारने देशात सतत वाढवणारी महागाई,वाढणारी बेरोजगारी व अग्निपथ सारख्या योजनेच्या विरोधात केन्द्र सरकारचा निषेध नोंदवित जिवनावश्यक वस्तूची किंमती कमी करा वाढती बेरोजगारी व अग्निपथ सारखी योजना रद्द करा या मागणीला धरूण या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या नेत्रुत्वात देवरीचे उपविभागीय अधिकारी अमोल सागर यांच्या मार्फत राज्याचे महामहिम राज्यपाल यांना आज शुक्रवार (ता.५आगस्ट) रोजी निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात कांग्रेस पक्षाने म्हटले आहे की, दिवसेंदिवस कृत्रिम महागाई निर्माण करून आणि अन्नधान्यावर सुध्दा जी.एस.टी. लावून गोरगरीब जनतेचे जिवन जगणे कठीण केले आहे. अशाप्रकारे अदानी-अंबानी सारख्या उद्योगपतींचे खिसे भरण्याचे कामकरित आहे. या जुलमी व अत्याचारी केन्द्रातील भा.ज.प. सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी,शेतमजूर संघटना व सर्वसामान्य जनतेची आवाज म्हणून आम्ही हे आंदोलन करित आहो.
तरी केन्द्र सरकार ने सतत वाढवणारी महागाई,वाढणारी बेरोजगारी व अग्निपथ सारखी योजना रद्द करावी जर जिवनावश्यक वस्तूची किंमती कमी न केल्यास तसेच गोरगरीब जनतेच्या विरूध्द केलेले कायदे रद्द न केल्यास कांग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात आमदार सहषराम कोरोटे,तालुका कांग्रेस अध्यक्ष संदिप भाटिया, माजी तालुकाध्यक्ष राधेशामजी बगडिया,जि.प.सदस्य उषाताई शहारे, नगरसेवक सरबजीतसिंग(शैंकी) भाटिया , मोहनजी डोंगरे,नितीन मेश्राम, शकील कुरैशी , नगरसेवीका सुनिताताई शाहू , पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे ,रंजितजी कासम , भारतीताई सलामे ,अनुसयाताई सलामे, माजी नगरसेवक ओमप्रकाशजी रामटेके , माजी पं.स.सदस्य रामेश्वर बहेकार, जीवन सलामे, सुरेंद्र बन्सोड, युवक कांग्रेस शहराध्यक्ष कुलदीपजी गुप्ता , अविनाश टेंभरे, अमित तरजुले, छगन मुंगणकर , राजेश गहाणे, आकिब बेग, अणवंताताई आचले, छायाताई मडावी, मीनाताई राऊत, मनीषाताई डुंबरे , नरेश राऊत, सचिन मेळे, कलिराम किरसान यांच्यासह देवरी तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share